हडपसर (पुणे) – समाजसेवेचा वसा घेत असताना समाजाच्या उपयोगी पडावे व आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो. या
एकाच भावनेतून समाजातील गरजू घटकांना या सेवेचा लाभ घेता यावा. ही उदात्त भावना उराशी बाळगून माजी नगरसेवक आबा तुपे यांचे काम आदर्शवत आहे, असे मत माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी व्यक्त केले. भारतरत्न माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची जयंती व माजी नगरसेवक मारुतीआबा तुपे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मोफत आरोग्य शिबीर व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्याचे उद्घाटन माजी राज्यमंत्री कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी विकास रासकर,दिलीप तुपे, जीवन जाधव, रवी तुपे, भूषण तुपे, माऊली कुडले, अमित गायकवाड, ओंकार तुपे, संजय पारेख, महेश ससाणे, नितीन ससाणे, युवराज मोहरे, राहुल मोडक, तेजस गाढवे,संकेत झेंडे, राजू महाडिक, बाळू ताकवले आदीजण उपस्थित होते.शिबिराला तरुणांकडून व रुग्णांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. १६१ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
तर सुमारे एक हजार रुग्णांनी तपासणी करून घेतली.११ जणांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोफत करून देण्यात येत आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेद्र मोदी यांची मन कि बात राशन के साथ हा कार्यक्रम घेण्यात आला. तसेच युवकांसाठी बॉक्सीग स्पर्धा व क्रिकेट स्पर्धाही घेण्यात आल्या. स्नेहमेळाव्यात राजकीय व सामाजिक पदाधिकारी व हजारो नागरिकांनी उपस्थिती लावून आबा तुपे यांना शुभेच्छा दिल्या.
मारुतीआबा तुपे युवा प्रतिष्ठान व धर्मेवीर शंभूराजे योगा ग्रुप वतीने आयोजन करण्यात आले होते.