रांजणगाव गटात रक्तदान शिबिरास प्रतिसाद जगदंब, पाचुंदकरांचा पुढाकार
रांजणगाव गणपती – स्वातंत्र्यदिनाच्या अमृतमहोत्सवानिमित्त शिरुर लोकसभा मतदारसंघाचे संसदरत्न, खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या संकल्पनेतून आणि जगदंब प्रतिष्ठानतर्फे आयोजित रक्तदान शिबीर आयोजित केले होते. शिबिरास रांजणगाव गणपती-कारेगाव जिल्हा परिषद गटातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी रक्तदात्यास आजीवन मोफत रक्त, नातेवाईकांना 1 वर्ष मोफत रक्त तसेच 6 लाख रुपयांचा मोफत विमा देण्यात येणार आहे.
रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बलवंत मांडगे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी शिबिरास खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आवर्जून भेट देत शिबीर यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केल्याबद्दल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर पाटील यांचे आभार मानले. रांजणगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शिबिराचे नियोजन मानसिंग पाचुंदकर-पाटील मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले होते.
यावेळी खंडोबा यात्रा कमिटीचे अध्यक्ष शिवाजी शेळके, आंबेगाव-शिरुर विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादीचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या स्वाती दत्तात्रय पाचुंदकर पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शेखर पाचुंदकर पाटील, खरेदी- विक्री संघांचे संचालक दत्तात्रय कदम, रांजणगावचे सरपंच सर्जेराव खेडकर, निमगाव भोगीचे सरपंच उत्तम व्यवहारे, आत्माराम खेडकर, दिलीप खळदकर, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. स्नेहल घोडेराव, डॉ. महेश सातव, रांजणगाव गणपती-कारेगाव जिल्हा परिषद गटातील सर्व गावांचे आजी-माजी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक, तंटामुक्तीचे पदाधिकारी, डॉक्टर्स, आरोग्यसेविका, आशा वर्कर व ग्रामस्थ उपस्थित होते.