पिंपळे गुरव, (वार्ताहर) -जग द्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान आयोजित सांगवी आणि दापोडी शाखेच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन रविवारी सकाळी 8 ते 5 या वेळेत करण्यात आले होते. जुनी सांगवी येथील गावठाण परिसरातील मारुती मंदिर येथे शिबिर झाले.
या वेळी रक्तदात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत दुपारपर्यंत 35 जणांनी रक्तदान केले. रक्तदानासाठी अक्षय ब्लड सेंटर, हडपसर यांच्या सहकार्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. सांगवी आणि दापोडी शाखेच्या सर्व सेवेकरी, भक्तगण यांनी रक्तदान शिबिर यशस्वीपणे पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले.