पुणे :– एकवट मानधनावरील सेवकांना पुणे महापालिकेमध्ये कायम रूजू होण्याच्या प्रस्तावाला मान्यता मिळाली. यासाठी राष्ट्रवादी काॅग्रेसचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी वेळोवेळी पाठपुरावा केल्यामुळे आज सेवकांना न्याय मिळाला. त्यामुळे सर्वसेवकांनी रविवारी (दि. 10) दीपक मानकर यांची भेट घेऊन आभार व्यक्त केले. तर मानकर यांनीही सर्व सेवकांना शुभेच्छा दिल्या.
पुणे महानगरपालिका मुख्य सभेमध्ये समाजविकास विभागामधील एकवट मानधनावरील सेवकांना पुणे मनपामध्ये कायम रुजू होण्यासाठीचा प्रस्ताव मान्य झाल्यानंतर अंतीम प्रस्ताव मंजुरीसाठी राज्य शासनाकडे पाठविण्यात आला होता. या प्रस्तावाला राज्य सरकारने नुकतीच मंजुरी दिल्याचे सांगण्यात आले.
आज आपण केलेल्या प्रयत्नाना यश आले, सेवकांच्या चेहर्यावर आनंद दिसला याचे समाधान वाटते, असा भावना दीपक मानकर यांनी व्यक्त केल्या. या सेवकांना पुणे मनपामध्ये कायम सेवेत रुजू होण्यासाठीचे आज्ञापत्र महापालिका आयुक्त यांच्या मान्यतेने पारीत करण्यात आले असून, सर्व 149 सेवक पुणे मनपामध्ये रुजू झाले आहेत.