पुलवामा – जम्मू-काश्मीरच्या अनंतनागमध्ये सुरक्षा दलांना एक मोठे यश मिळाले आहे. भारतीय लष्करानं पुलवामा हल्ल्यासाठी अदिल दार या दहशतवाद्याला गाडी पुरवणाऱ्या दहशतवाद्याला ठार केले आहे.
अनंतनागमध्ये भारतीय जवानांनी दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. ते जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे सदस्य होते. तौसीफ अहमद भट आणि हाफिज सजाद भट असे कंठस्नान घालण्यात आलेल्या दहशतवाद्यांची नावे आहेत. यामधील एका दहशतवाद्याचा हा पुलवामा हल्ल्याशी संबंध होता. त्यानं आदिल दारला पुलवामा येथे आत्मघातकी स्फोट करण्यासाठी गाडी पुरवली होती.
J&K DGP Dilbag Singh on Marhama (Anantnag) encounter: We neutralised 2 militants. They've been identified as Sajad Ahmad Bhat & Tawseef Ahmad Bhat, both are residents of Marhama & have links with Jaish-e-Mohammed. Sajad was involved in turning his car into an IED in 14 Feb blast pic.twitter.com/ZOZpwqTvZd
— ANI (@ANI) June 18, 2019
दरम्यान, 14 फेब्रुवारी रोजी भारतीय जवानांच्या ताफ्यावर स्फोटकांनी भरलेली गाडी आदळून आत्मघातकी हल्ला करण्यात आला होता. यामध्ये 40 जवान शहीद झाले होते. NIAनं तपास सुरू केल्यानंतर अनेक गोष्टींचा खुलासा झाला होता.