मोदी सरकारने दाखवला ‘पंधरा’ भ्रष्ट अधिकाऱ्यांना घरचा रस्ता

नवी दिल्ली- सध्या मोदी सरकारने भ्रष्ट अधिकाऱ्यांविरोधात कडक निर्णय घ्यायला सुरुवात केल्याचे चित्र दिसून येत आहे. पूर्वी आयकर विभागाच्या बारा 12 ज्येष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई केल्यानंतर, आज पुन्हा एकदा मोदी सरकारने एक मोठी कारवाई  केली आहे.

दरम्यान, मंगळवार (१८जून) रोजी एक्साइज आणि कस्टम विभागाच्या 15 वरिष्ठ अधिकाऱ्यांवर सक्तीची कारवाई करत निवृत्त करण्यात आले आहे. भ्रष्टाचार, अकार्यक्षमता आणि कामचुकारपणाचा या अधिकाऱ्यांवर आरोप होता. त्यामुळे आता, या अधिकाऱ्यांना घरचा रस्ता दाखवला आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.