मुंबई : भारत निवडणूक आयोगाने ‘166 – अंधेरी (पूर्व) विधानसभा‘ मतदार संघाची पोटनिवडणूक जाहीर केली आहे. या अनुषंगाने जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार अंधेरी (पूर्व) विधानसभा मतदारसंघात (Andheri East Assembly constituency) मतदानाच्या दिवशी म्हणजे दिनांक 3 नोव्हेंबर 2022 रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
मुंबईतील ‘१६६-अंधेरी (पूर्व) विधानसभा’ मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी मतदानाच्या दिवशी (३ नोव्हेंबर) मतदारसंघात सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे, अशी माहिती भारत निवडणूक आयोगाने दिली. कामासाठी मतदारसंघाच्या बाहेर असणाऱ्या मतदारांना देखील ही सुट्टी लागू असेल. pic.twitter.com/i9iR1Uihju
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) October 19, 2022
ही सार्वजनिक सुट्टी ‘166 – अंधेरी पूर्व‘ या मतदारसंघाच्या क्षेत्रातील जे मतदार कामासाठी अंधेरी मतदार संघांच्या बाहेर असतील, त्यांना देखील लागू असल्याचे आदेशित करण्यात आले आहे.
Himachal Pradesh Assembly Election 2022 : भाजपची 62 उमेदवारांची यादी जाहीर
तसेच केंद्र सरकारची कार्यालये, निमशासकीय कार्यालये, सार्वजनिक उपक्रम, बँका इत्यादींना ही सार्वजनिक सुट्टी लागू राहील, असे सामान्य प्रशासन विभागाने एका अधिसूचनेद्वारे कळविले आहे.