PUBG न्यू स्टेट गेमने आठवड्यात ओलांडला डाऊनलोड्सचा एक कोटीचा टप्पा!

पब्जीचे (PUBG) न्यू स्टेट गेम भारतात गेल्या आठवड्यातच लॉन्च झाले. बॅटलग्राउंड्स मोबाईल इंडिया विकसित करणार्‍या क्राफ्टन या कंपनीने हे न्यू स्टेट गेम लॉन्च केले आहे. लॉन्च झाल्याच्या अवघ्या एका आठवड्यातच या गेमने एक कोटी डाउनलोडचा टप्पा ओलांडला आहे.  पब्जी न्यू स्टेट Android आणि iOS साठी विनामूल्य उपलब्ध आहे.

गेल्या आठवड्यात जागतिक प्रक्षेपणानंतर, अनेक भारतीय खेळाडूंना या गेममुळे समस्यांचा सामना करावा लागला. अनेक तास खेळ खेळण्यात खेळाडूंना अपयश आले. डाउनलोडचा हा आकडा गुगल प्ले-स्टोअरवरून आहे. ऍपल ऍप स्टोअरवर किती डाउनलोड झाले याबाबत सध्या कोणतीही माहिती उपलब्ध नाही.

सध्या, खेळाडूंना पब्जी न्यू स्टेट गेममध्ये बक्षिसे देखील मिळत आहेत. ही बक्षिसे 11 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर या कालावधीत पूर्व सत्रांतर्गत उपलब्ध असतील. हा गेम भारतासह 200 देशांमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. अनेक वापरकर्त्यांनी पब्जी न्यू स्टेटमुळे फोन क्रॅश झाल्याची तक्रारही केली आहे. ही समस्या Android 12 मध्ये येत आहे.

पब्जी बॅटल रॉयल, 4v4 डेथमॅच आणि ट्रेनिंग ग्राउंड या तीन वेगवेगळ्या गेम मोडसह न्यू स्टेट सादर केले आहे. खेळाडूंना इनगेम बक्षिसे देखील मिळतील. कंपनीने चार दिवसीय स्ट्रीम पार्टी देखील आयोजित केली आहे जी 12 नोव्हेंबरपासून सुरू होत आहे आणि 15 नोव्हेंबरपर्यंत चालेल. मॉर्टल, स्काउट, डायनॅमो, तन्मय भट्ट यांसारखे प्रभावशाली मंडळी या पार्टीला उपस्थित राहणार आहेत. 15 नोव्हेंबरपासून प्ले विथ फ्रेंड्स मोहीमही सुरू होत आहे.

पब्जी न्यू स्टेट हा गेम 2051 सालच्या धर्तीवर तयार करण्यात आले आहे. गेम तुम्हाला 2051 मध्ये येणारी वाहने, शस्त्रे, नवीन नकाशे आणि अधिकची झलक देईल. हा गेम Krafton ने प्रकाशित केला आहे जी दक्षिण कोरियाची व्हिडिओ गेमिंग कंपनी आहे. तीच कंपनी भारतात पब्जीचा नवीन अवतार, बॅटलग्राउंड मोबाईल इंडिया (Battleground Mobile India) चालवत आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.