इस्लामाबाद – “पब्जी’ (PUBG) खेळण्यास विरोध केल्यामुळे एका व्यक्तीने बहिणीची गोळ्या घालून हत्या केल्याची घटना पाकिस्तानमध्ये घडली आहे. पाकिस्तानमधील झंग जिल्ह्यातील अथारा हझार तालुक्यात ही घटना घडली आहे.
असाच स्वरुपाच्या आणखीन एका घटनेमध्ये “पब्जी’ खेळण्यास विरोध केल्यामुले 13 वर्षीय मुलाने घरातून 70 हजार पाकिस्तानवी रुपये चोरल्याचेही उघड झाले आहे.
या मुलाने हे चोरलेले पैसे घेऊन पळ काढला आणि या पैशातून त्याने क्रीडाविषयक कॉश्च्युमची खरेदी केली. यानंतर 3 दिवसांनी पोलिसांनी या मुलाचा ठावठिकाणा सोधून काढला आणि त्याला ताब्यात घेतले आणि कुटुंबियांच्या स्वाधीन केले आहे, असे एका वृत्तसंस्थेच्या बातमीमध्ये म्हटले आहे.
याच वर्षी 20 जुलैला अशाच प्रकारे “प्बजी’च्या आहारी गेलेल्या एका व्यक्तीने आपल्या 3 भगिनींची हत्या केल्याचे पाकिस्तानमधील मुझफ्फरगडमधील पोलिसांनी सांगितले. थर्मल पॉवर कॉलनीतील सुरक्षा रक्षकाच्या तिन्ही मुली मृतावस्थेत आढळल्यावर हा प्रकार उघडकीस आला होता.
या तिघींच्या गळ्यावर वार झालेले होते. या मुलींचा भाऊ बसित यानेच या हत्या केल्याचे पोलिसांच्या तपासामध्ये निष्पन्न झाले होते. बसित हा “पब्जी’च्या आहारी गेला असून त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे.