मांजरी : हडपसर – मांजरीतील महिलांना त्यांनी तयार केलेल्या वस्तू विक्रीसाठी केंद्र उपलब्ध करुन दिले आहे. सीमा शेंडे यांच्या संकल्पनेतुन सुरू केलेले हे केंद्र अनेक महिलांसाठी व्यासपीठ बनले आहे, दिवाळी महोत्सवाच्या निमित्ताने काहींना या केंद्रामुळे आत्मविश्वास मिळाला आहे. असे मत भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी व्यक्त केले.
उद्योजिका ग्रुप समूहाच्या संस्थापिका आणि भाजपा ओबीसी महिला आघाडीच्या अध्यक्षा सीमा शेंडे यांनी हरपळे लॉन्स येथे दिवाळी महोत्सव आयोजित केला होता.त्याचे उद्घाटन शहराचे भाजपा अध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या हस्ते झाले,त्यावेळी ते बोलत होते.
या वेळी शहर सरचिटणीस संदीप लोणकर, हडपसर विधानसभेचे अध्यक्ष संदीप दळवी, गणेश घुले, उपाध्यक्ष सुमित आप्पा घुले, शैलेश बेल्हेकर आदीजण उपस्थित होते.
नुकताच दिवाळी महोत्सव यानिमित्ताने घरगुती महिलांना आपला माल विकण्यासाठी एक हक्काचे व्यासपीठ मिळावे हा उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.भविष्यातही वारंवार असे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येईल. असे सीमा शेंडे यांनी सांगितले.