लोणी धामणी -पहाडदरा (ता. आंबेगाव) ठाकरवाडी येथील तरुणांना रोजगार निर्मितीसाठी पंचायत समिती सदस्य रवींद्र करंजखेले यांच्या प्रयत्नातून बॅंजो पार्टीचे सर्व साहित्य नुकतेच पंचायत समिती कार्यालय घोडेगाव येथे वाटप करण्यात आले.
यावेळी सभापती संजय गवारी, माजी उपसभापती नंदकुमार सोनावले, राजाराम बाणखेले, शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुनील बाणखेले, ग्राहक संरक्षण उपजिल्हाप्रमुख शिवाजी राजगुरू, सरपंच सागर जाधव, ठाकरवाडी येथील तरुण व ग्रामस्थ उपस्थित होते.