नारायणगाव -लेण्याद्री कोविड सेंटरमध्ये व्हेंटिलेटर व ऑक्सिजनची सोय करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना जुन्नर तालुक्याच्या वतीने तहसीलदार, गट विकास अधिकारी व आरोग्य विभाग जुन्नर यांना निवेदन देऊन करण्यात आले आहे.
जिल्हा उपाध्यक्ष मकरंद पाटे, तालुका अध्यक्ष साईनाथ ढमढेरे, उपतालुकाध्यक्ष दिलीप खिलारी, विभाग अध्यक्ष विकास मोरे, शहर अध्यक्ष मयुर वाळुंज, सुनिल शिंदे आदींनी केली आहे. तहसील कार्यालयात नायब तहसीलदार सचिन मुंढे याना निवेदन दिले आहे.
तालुक्यात कोविड सेंटरमध्ये किंवा ग्रामीण रुग्णालयात ऑक्सीजन व व्हेंटिलेटर सुविधा नसल्याने सर्वसामान्य लोकांना पुणे येथे जावे लागते. त्या ठिकाणी जाण्यास विलंब झाला व सरकारी रुग्णालयात व्यवस्था उपलब्ध न झाल्यास खासगी रुग्णालयात अव्वाच्या सव्वा पैसे देण्याची परिस्थिती नसल्याने रूग्णांचे हाल होऊन जीव जाण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे ही मागणी केली आहे.