सैनिकांच्या कर्तृत्वाचा अभिमान – बहिरट

पुणे – देशाच्या सीमेवर लढणाऱ्या जवानांमुळे प्रत्येक भारतीय नागरिक सुरक्षित आहे. सैनिक देशासाठी सांभाळत असलेल्या या जबाबदारीमुळे देशाच्या सीमा सुरक्षित आहेत. त्यामुळे सैनिकांच्या कर्तृत्वाचा आम्हाला अभिमान आहे, अशा भावना महाआघाडीचे शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार दत्ता बहिरट यांनी व्यक्त केल्या.

बहिरट यांनी मंगळवारी रेंजहिल्स येथील पॅराप्लिजीक केंद्रातील युद्धात जखमी झालेल्या जवानांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. तसेच त्यांच्याशी संवादही साधला. यावेळी या जवानांनी बहिरट यांना विजयासाठी शुभेच्छाही दिल्या. तसेच त्यांच्याशी अनौपचारिक गप्पाही मारल्या.

मनोज भोरे, कर्नल आर. के. मुखर्जी, कर्नल बी. एल. भार्गव, पॅराप्लिजीक राष्ट्रीयखेळाडू नडार, अंथोनी परेरा, कृष्णा, रावत, संतोषी राजेंद्र वेणुगोपाल, बाळू सोरटे, सॅमसन जाधव उपस्थित होते.

बहिरट म्हणाले, सीमेवरील जवान चोवीस तास देश रक्षणासाठी सज्ज असतात. सैनिक म्हणून तुम्ही देशासाठी करत असलेल्या कार्यामुळे आज देशातील सीमा सुरक्षित आहेत. सर्वसामान्य नागरिक सुखी आनंदी राहत आहे. तुमच्या कर्तृत्वाचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.