लांडगे यांना विविध संस्था, संघटनांचा पाठिंबा

पिंपरी – भोसरी विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टी, शिवसेना, आरपीआय, रासप, रयत क्रांती शेतकरी संघटना आणि शिवसंग्राम संघटना महायुतीचे उमेदवार आमदार महेश लांडगे यांना विविध संस्था संघटनांनी आज पाठिंबा जाहीर केला आहे. जीवनविद्या मिशन, राजपूत समाज संगठन पिंपरी चिंचवड, अविरत श्रमदान एक पाऊल भावी पिढीसाठी, परशुराम युवा प्रतिष्ठान आदी संस्थांचा त्यात समावेश आहे. महेश लांडगे हे राष्ट्र व समाजहिताचे काम प्रभावीपणे करत असल्याने हा पाठिंबा जाहीर करण्यात आल्याचे या संस्थांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

जीवनविद्या मिशनने आमदार महेश लांडगे यांना सद्‌गुरुंचे आशीर्वाद आणि शुभेच्छा पाठविल्या आहेत. राजपूत समाज संगठन पिंपरी चिंचवड या संस्थेचे अध्यक्ष शिवकुमारसिंह बायस तसेच सचिव श्रीराम परदेशी यांनी संघटनेचा पाठिंबा लांडगे यांना जाहीर केला आहे. समस्त राजपूत संघटनेने मेळावा घेऊन लांडगे यांना पाठिंबा दिला असून यावेळी महापौर राहुल जाधव, सामाजिक कार्यकर्ते कार्तिक लांडगे आदी उपस्थित होते. राजपूत समाज राष्ट्रहित व समाजहितासाठी इतिहास काळापासून कार्यरत आहे. आमदार लांडगे हे राष्ट्र व समाजहिताचे काम प्रभावीपणे करत असल्याने त्यांना पाठिंबा देत असल्याचे अध्यक्ष बायस व सचिव परदेशी यांनी सांगितले.

अविरत श्रमदान एक पाऊल पुढील पिढीसाठी, नामस्मरण भजनी मंडळ, पिंपरी चिंचवड लघुउद्योजक संघटना, पिंपरी चिंचवड बार असोशिएशन, शिक्षक संघटना, पीएमपीएमएल इंटक एम्प्लॉईज संघटना, गुजराथी समाज, मारवाडी समाजाचे अध्यक्ष संजय पटनी, बारी समाज, साऊथ इंडियन असोशिएशन, बांधकाम कामगार सेना, सिंधूदुर्ग जिल्हा लोकसेवा प्रतिष्ठान, खान्देशी बहुउद्देशीय युवा मंच, भारतरत्न मौलाना अबूल कलाम आझाद समिती, स्वाभिमानी कामगार संघटना, उत्तर भारतीय मित्र मंडळ, शिवगर्जना कामगार संघटना, स्वाभिमानी श्रमिक कामगार संघटना यांनीही भोसरी विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टी, शिवसेना, आरपीआय, रासप, रयत क्रांती शेतकरी संघटना आणि शिवसंग्राम संघटना महायुतीचे उमेदवार आमदार महेश लांडगे यांना पत्राद्वारे पाठिंबा जाहीर केला आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)