नवी दिल्ली – बॅंक कर्ज गैरव्यवहार प्रकरणी पोल्ट्री व्यवासायिकाची 750कोटींची मालमता सक्तवसुली संचलनालयाने मनी लॉन्डरिंग विरोधी कायद्यांतर्गत जप्त केली आहे.
या संदर्भात आज ईडीने आज एका व्यक्तीला अटक केली आहे. बॅंकेने दिलेल्या पतपुरवठ्याच्या सुविधेचा गैरफायदा घेऊन हा आर्थिक गैरव्यवहार केला गेला होता.
साई चंद्रशेखर असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव असून स्थानिक न्यायालयाने त्यांना 7 दिवसांची ईडीची कोठडी सुनावली आहे. वीरकरण अवस्थी, विनोद सिरोही आणि केपीएमजी इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या विरोधातील ईडीकडून सुरू असलेल्या तपासाचा भाग म्हणून ही कारवाई करण्यात आली आहे.