पालघर – नालासोपाऱ्यात थर्माकोल कंपनीला आज भीषण आग लागल्याची दुर्घटना घडली आहे. ही दुर्घटना मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील पूर्व पेल्हार फाटाजवळ कंतारीया कंपाऊंडमध्ये घडली.
घटनास्थळापासून अर्धा ते एक किलोमीटर अंतरावर आगीचे लोळ दिसत होते. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.
आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्नीशमन दलाच्या काही गाड्या घटनास्थळावर दाखल झाल्या. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीने प्रयत्न सुरु आहेत. अग्नशीमन दलाच्या जवानांसह वालीव पोलीस, वसई-विरार पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे.
या आगीत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाल्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.