मुंबई – अभिनेत्री प्रियांका चोप्रा आजच्या काळात जागतिक अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध आहे. प्रियांका आज स्वत:च्या बळावर इथपर्यंत पोहोचली आहे हे सर्वांनाच माहिती आहे. पण, नुकतेच तिने एका मुलाखतीत अनेक खुलासे केले आहेत. एक यशस्वी अभिनेत्री असूनही तिने अपयशाबाबत स्वतःबद्दल अशी गोष्ट सांगितली आहे, ज्यावर तुमचा विश्वास बसणार नाही. इतरांप्रमाणेच प्रियांकाचाही एक मायनस पॉइंट आहे ज्यावर ती उघडपणे बोलली आहे.
अलीकडेच, पिंकविलाला दिलेल्या एका मुलाखतीत प्रियांका चोप्राने स्वतःबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. अपयशावर बोलताना ती म्हणाली, “आता मी आयुष्याकडे आणि अपयशाकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहते. माझ्या आयुष्यातही अनेक अपयश आले. माझ्याकडे बर्याच गोष्टी आहेत ज्याबद्दल मी बोलत नाही. मी आजही माझ्या कुटुंबासमोर माझ्या अपयशाबाबत रडत असते.”
ती पुढे म्हणाली, “मी अपयशावर थांबणारी व्यक्ती नाही. कारण, अपयश हा जीवनाचा एक भाग आहे ज्यापासून आपण पळून जाऊ शकत नाही. तो प्रत्येकाच्या आयुष्यात येतो. मी आज 40 वर्षांचा झाले पण, जेव्हा मी माझ्या अपयशाचा विचार करते तेव्हा खूप त्रास होतो. पण नंतर मी माझ्या स्वःताची समजूत काढत आधीपेक्षा जास्त मजबूत होते.”
वर्कफंटबाबत सांगायचं झाल्यास, प्रियांकाचे हॉलिवूडपासून ते बॉलिवूडपर्यंत अनेक प्रोजेक्ट्स येत्या काळात पूर्ण होणार आहेत. ती लवकरच रिचर्ड मॅडनसोबत ‘सिटाडेल’ या स्पाय थ्रिलर मालिकेत दिसणार आहे. त्याचबरोबर ती झी ले जरा या बॉलिवूड चित्रपटातही मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेत्री कतरिना कैफ आणि आलिया भट्ट देखील दिसणार आहेत.