Priyanka Gandhi in Nyayatra। काँग्रेसच्या भारत जोडो न्याय यात्रेचा दुसरा टप्पा मुरादाबाद येथून पुन्हा सुरू झाला आहे. आजारी असणाऱ्या काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांनी आज न्याय यात्रेत सहभाग घेतला. यावेळी काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या सोबत त्यांनी उघड्या जीपमधून जनतेला अभिवाद केले. या यात्रेचे लोकांनी पुष्पवृष्टी करून स्वागत केले. यावेळी समाजवादी पक्षाचे कार्यकर्तेही राहुल गांधींसोबत पक्षाचा झेंडा हातात घेऊन चालताना दिसले.
उद्या अखिलेशही यात्रेत सामील होणार Priyanka Gandhi in Nyayatra।
प्रियांका गांधी मुरादाबाद येथून यात्रेत सामील झाल्या आहेत. पुढे यात्रेत त्या अमरोहा, संभल, बुलंदशहर, अलिगढ, हाथरस आणि आग्रा मार्गे फतेहपूर सिक्रीपर्यंत राहुल यांच्यासोबत असतील. प्रियांका गांधी चंदौली येथूनच या यात्रेत सहभागी होणार होत्या, मात्र प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्या यात सहभागी होऊ शकल्या नाहीत. रविवारी ही यात्रा आग्रा येथे पोहोचेल जिथे सपा प्रमुख अखिलेश यादव देखील त्यात सामील होतील असे सांगण्यात येतंय.
राहुल दोन दिवस विश्रांती घेणार Priyanka Gandhi in Nyayatra।
आग्रा नंतर ही यात्रा राजस्थानातील धौलपूरमध्ये दाखल होईल. यानंतर 26 फेब्रुवारी ते 1 मार्च या यात्रेला विश्रांती दिलीजाणार आहे. या दरम्यान राहुल गांधी 27 आणि 28 फेब्रुवारी रोजी इंग्लंडच्या केंब्रिज विद्यापीठात दोन विशेष व्याख्याने देणार आहेत. तसेच नवी दिल्लीत होणाऱ्या पक्षाच्या काही महत्त्वाच्या बैठकांना उपस्थित राहू शकतील. . या ब्रेकनंतर ‘भारत जोडो न्याय यात्रा’ पुन्हा एकदा ढोलपूर येथून २ मार्चला दुपारी २ वाजता सुरू होईल. यानंतर ते मुरैना, ग्वाल्हेर, शिवपुरी, गुना, शाजापूर आणि उज्जैनसह मध्य प्रदेशातील इतर जिल्ह्यातून जाईल.
मुंबईत समारोप होणार
‘भारत जोडो न्याय यात्रा’ बुधवारी कानपूरमध्ये होती, तर 22 आणि 23 फेब्रुवारीला यात्रेला ब्रेक आहे. तुम्हाला सांगतो की काँग्रेस आणि समाजवादी पक्षाने बुधवारीच लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटपाची घोषणा केली होती, ज्याअंतर्गत काँग्रेस उत्तर प्रदेशातील एकूण 80 जागांपैकी 17 जागांवर निवडणूक लढवणार आहे. 14 जानेवारी रोजी मणिपूर येथून ‘भारत जोडो न्याय यात्रा’ सुरू झाली. त्याचा समारोप पुढील महिन्यात मुंबईत होणार आहे.