मुंबई – भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू पृथ्वी शॉसोबत सेल्फी घेण्यावरून झालेल्या वादानंतर त्याला मारहाण करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात एक महिला चाहती आणि पृथ्वी शॉ यांच्यात सुरूवातीला शाब्दिक चकमक झाल्यानंतर महिला चाहत्याकडून पृथ्वीला मारहाण झाल्याचे दिसून येत आहे.
या प्रकरणी शोभित ठाकूर आणि सना उर्फ सपना गिल यांच्यासह आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, त्यांनी आरोपाचे खंडन करत पृथ्वी शॉनेच प्रथम हल्ला केल्याचा दावा केला आहे.
व्हिडीओ येथे पहा 👇👇👇👇
Prithvi Shaw : भारतीय क्रिकेटर ‘पृथ्वी शॉ’ला महिलेकडून मारहाण; सोशल मीडियावर Video व्हायरल#PrithviShaw pic.twitter.com/2CHYRXfyAc
— Digital Prabhat (@Dainik_Prabhat) February 16, 2023
मिळालेल्या माहितनुसार, पृथ्वी शॉ आणि त्याचा मित्र क्लबमध्ये गेले होते. यावेळी काही चाहत्यांसोबत हा वाद सुरु झाला. या प्रकरणात महिला चाहतीने पृथ्वी शॉकडे सेल्फी घेण्याचा आग्रह धरला होता. यादरम्यान एकदा सेल्फी घेतल्यानंतर चाहती आणि तिच्या मित्रांनी अजून एक सेल्फी घेण्यासाठी आग्रह धरला. मात्र यावेळी पृथ्वीने नकार दिला.
यानंतर सेल्फी घेणाऱ्या चाहत्यांनी पृथ्वी शॉ याच्या मित्राच्या गाडीवर हल्ला केला. याशिवाय या प्रकरणी मुंबईच्या ओशिवारा पोलीस स्टेशनमध्ये 8 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय पोलिसांनी या प्रकरणाचा अधिक तपास सुरु केला.
Sangli : वेळेत पगार न झाल्याने ST कर्मचाऱ्याने संपवले आयुष्य; मन सुन्न करणारी घटना
दरम्यान, या घटनेचे 2 व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. यामधील एका व्हिडीओमध्ये या महिला चाहतीसोबत असलेल्या तिच्या मित्राच्या म्हणण्यानुसार, पृथ्वी शॉ आणि त्यांच्या मित्रांनी आम्हाला मारले. तर दुसऱ्या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये पृथ्वी शॉ आणि सोनेरी रंगाचा ड्रेस घातलेल्या महिलेसोबत बाचाबाची झाल्याचे दिसून येत आहे.