नवी दिल्ली : आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 72 वा वाढदिवस आहे. यानिमित्त देशातील विविध राज्यात अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आज पंतप्रधान वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत. ते आज मध्य प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत. तेथील कुनो नॅशनल पार्कमध्ये नामिबियातून भारतात आणलेले 8 चित्ते सोडण्यात येणार आहेत. त्या कार्यक्रमाला पंतप्रधान उपस्थित राहणार आहेत.
दरम्यान, वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदी यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. विविध स्तरातून त्यांना शुभेच्छा देण्यात येत आहेत. महाराष्ट्रातही 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा’ आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती. या पंधरवड्यामध्ये नागरिकांचे प्रलंबित अर्ज निकाली काढण्यासाठी संपूर्ण प्रयत्न करण्याचे निर्देश दिले. या पंधरवड्याच्या अंमलबजावणीचा मंत्रिमंडळ बैठकीत आढावा घेण्यात येणार आहे.
विविध राजकीय नेत्यांकडून पंतप्रधानांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. यामध्ये भाजपच्या नेत्यांसोबतच विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी देखील पंतप्रधानांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. राहुल गांधी यांनी ट्वीट करत मोदींना शुभेच्छा दिल्या आहेत.
Wishing PM Narendra Modi a happy birthday.
— Rahul Gandhi (@RahulGandhi) September 17, 2022
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वामुळे देशाची प्रगती झाली. तसेच सुशासनाला अभूतपूर्व बळ मिळालं आहे. त्यांच्या नेतृत्वात देश मजबूत झाल्याचे सिंह यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.
भारत के यशस्वी प्रधानमंत्री, श्री @narendramodi को जन्मदिवस की हार्दिक बधाई एवं शुभकामनाएँ। उन्होंने अपने नेतृत्व से देश में प्रगति और सुशासन को अभूतपूर्व मज़बूती दी है और पूरे विश्व में भारत की प्रतिष्ठा और स्वाभिमान को नई ऊँचाई दी है। ईश्वर उन्हें स्वस्थ रखें और दीर्घायु करें।
— Rajnath Singh (@rajnathsingh) September 17, 2022
काँग्रेसचे नेते शशी थरुर यांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी ट्वीट करत शुभेच्छा दिल्या आहेत. देशवासीयांच्या जीवनातील सर्व अंधार दूर करण्यासाठी तुम्ही काम करा, असे शशी थरुर यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.
Wishing our @PMOIndia Shri @narendramodi ji a very happy birthday, good health & long life. May he work to remove the darkness enveloping so many of our fellow citizens & bring them the light of progress, development & social harmony instead. pic.twitter.com/3vaYXtGcu7
— Shashi Tharoor (@ShashiTharoor) September 17, 2022
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील ट्वीट करत पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवसाच्या शुभच्छा दिल्या आहेत. तुमच्या नेतृत्वात देशातील भीती, भूक आणि भ्रष्टाचार पूर्णपणे नष्ट झाला पाहिजे असे गडकरींनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.
आदरणीय प्रधानमंत्री श्री @narendramodi जी को जन्मदिन की हार्दिक शुभकामनाएँ। आप स्वस्थ और दीर्घायु रहें तथा आपके नेतृत्व में देश से भय, भूख और भ्रष्टाचार पूरी तरह समाप्त हो व हम पुनः विश्व गुरू का स्थान प्राप्त करें यही शुभकामनाएँ। #HappyBdayModiJi pic.twitter.com/Y1tr7WEGP8
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) September 17, 2022
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनीही पंतप्रधान मोदींचे अभिनंदन केले आहे. पंतप्रधान मोदींनी आपले जीवन लोकांच्या कल्याणासाठी समर्पित केले आहे. त्यांच्या नेतृत्वात देशाची प्रगती होत असल्याचे चौहान यांनी म्हटले आहे.
राष्ट्र के नवनिर्माण में तपस्वी की भांति अविराम कार्यरत पीएम श्री @narendramodi जी का व्यक्तित्व और वाणी महान प्रेरणा का स्रोत है। आपके कुशल नेतृत्व में नये भारत के निर्माण का स्वप्न साकार हो रहा है। प्रधानमंत्री जी देश की यही शुभेच्छा कि आप जियें हजारों साल! #HappyBDayModiJi pic.twitter.com/GKVVIkwt5x
— Shivraj Singh Chouhan (@ChouhanShivraj) September 17, 2022
केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी ट्विट करून पंतप्रधान मोदींचे अभिनंदन केले आहे. देशहिताचे तुमचे विचार आणि कर्मयोगींच्या रूपातील तुमचे अप्रतिम व्यक्तिमत्व आम्हा करोडो भारतीयांसाठी प्रेरणास्थान असल्याचे इराणी यांनी म्हटले आहे.