Hindu temple in Abu Dhabi – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतंच उद्घाटन केलेले अबूधाबीतील पहिले हिंदू मंदिर भाविकांसाठी 1 मार्चपासून खुले झाले आहे. बोचारेसंवासी श्री अक्षर पुरुषोत्तम स्वामीनारायण संस्तेच्यावतीने हे मंदिर उभारण्यात आले आहे. । Hindu temple in Abu Dhabi
अबूधाबीतील अबू मेरेखा येथे 27 एकर भूखंडावर हे मंदिर उभारण्यात आले असून, हे मंदिर उभारण्यासाठी 700 कोटी रुपये खर्च आला आहे. दिनांक 14 फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मंदिराचे उद्घाटन करण्यात आले होते. । Hindu temple in Abu Dhabi
त्यानंतर म्हणजे 1 मार्चपासून दररोज हे मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे. केवळ सोमवारी देखभालीसाठी मंदिर बंद असणार आहे, असे मंदिर व्यवस्थापनाने म्हटले आहे. अबूधाबीतील हे हिंदू मंदिर जगभरातील भाविक आणि पर्यटकांना आकर्षित करत आहे.
सर्वसामान्यांसाठी खुले झाल्यानंतर पहिल्याच रविवारी भाविकांनी रेकॉर्डब्रेक हजेरी लावली. विशेष म्हणजे याठिकाणी भक्तांचा महामेळाच भरला होता. अपेक्षेपेक्षा जास्त गर्दी झाली. दुबईच्या या मंदिरात अयोध्येच्या राम मंदिराप्रमाणेच भाविकांची मोठी गर्दी होत असून रविवारी सुमारे 65,000 हून अधिक भाविक आणि पर्यटांनी हजेरी लावली BAPS Temple कडून ही आकडेवारी देण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंदिर भाविकांसाठी खुलं झाल्यानंतरच्या पहिल्याच रविवारी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. तब्बल 65000 भाविकांनी दर्शन घेतले. सकाळी मंदिराचे द्वार उघडताच 40,000 हून अधिक भाविक दर्शनासाठी आले. तर संध्याकाळी 25000 भाविक हे दर्शनासाठी पोहचले. प्रचंड गर्दी असतानाही कोणतीही धक्काबुक्की न करता संयमाने रांगेत उभे राहिले.
संबधित बातमी नक्की वाचा….. । Hindu temple in Abu Dhabi