नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी अमेरिकेचे निर्वाचित अध्यक्ष ज्यो बायडेन यांच्याशी फोन वरूच चर्चा केली. यावेळी दोन्ही नेत्यांनी कोविडचा प्रादुर्भाव, वातावरणातील बदल, इंडो-पॅसिफीक क्षेत्रातील सहकार्य इत्यादी विषयांवर चर्चा केली.
परस्परांमधील भागीदारी आणखी वाढवण्याचा निर्धारही दोन्ही नेत्यांनी यावेळी व्यक्त केला.
पंतप्रधानांनी बायडेन यांचे त्यांच्या निवडीबद्दल अभिनंदनही केले. स्वत: मोदींनी त्यांच्या ट्विटरवर ही माहिती दिली. भारताच्यावतीने कमला हॅरीस यांनाही आमचे अभिनंदन कळवा असा संदेशही मोदींनी बायडेन यांना दिला.
कमला हॅरीस यांना मिळालेले हे यश भारतीय-अमेरिकन नागरीकांसाठी अत्यंत अभिमानास्पद आणि प्रेरणादायी आहे असेही मोदींनी म्हटले आहे. बायडेन यांनी या आधीच भारताशी असलेले अमेरिकेचे संबंध आणखी वेगळ्या उंचीवर नेण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.