मुंबई- अभिनेत्री रिंकू राजगुरु नेहमीच वेगवेगळे लुक ट्राय करत असते. त्यात ती भारतीय वेशाला जास्त प्राधान्य देत असते. नुकतेच तिने सोशल मीडियावर साडीतील फोटो पोस्ट केले आहे. तिच्या या फोटोला चाहत्यांकडून उत्तम प्रतिसाद मिळतो आहे.
काही वर्षांपुर्वी आर्चीने सगळ्यांना आपलं वेड लावलं होतं. यावेळेही साडीतील फोटो अनेकांना भूरळ घालणारे आहेत. रिकू दिवाळी आधी लंडनहून भारतात परतली. भारतात दिवाळी साजरी केली.
अभिनेत्री रिंकू राजगुरुची लंडनवारीवर होती. छू मंतर या चित्रपटाचं शुटींग सध्या लंडनमध्ये सुरु होतं. त्यासाठी रिंकू लंडनला गेली होती. लंडनमधील एक साडीतील व्हीडियो तिने सोशल मीडियावर पोस्ट केला होता. या व्हीडियोवर अनेकांनी प्रतिक्रिया नोंदवल्या होत्या.
दरम्यान, रिंकूचा हा अंदाज चाहत्यांसाठी नवीन आहे. या आधी 100 या वेबसीरीजमध्ये साकारलेल्या बिनधास्त भूमिकेला अनेकांकडून चांगल्या प्रतिक्रिया आल्या होत्या. लॉकडाऊनच्या काळात रिंकूने फिटनेसकडे प्रकर्षाने लक्ष दिलं होतं.
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram