मुंबई – पेट्रोल, डिझेलसोबतच सर्वसामान्यांसाठी स्वस्त असे औषध समजल्या जाणाऱ्या पॅरासिटामॉलसह तब्बल 800 औषधांच्या दरात वाढ करण्यात आली आहे. नॅशनल फार्मासिट्युकल प्रायझिंग ऑथोरिटीने ही दरवाढ केली आहे.
10.7 टक्क्यांची वाढ यावेळी करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली. गेल्या वर्षीच्या तुलनेतील होलसेल प्राईज इंडेक्स आणि 2020 च्या तुलनेत ही 10.7 टक्क्यांची वाढ सर्वसामान्यांच्या खिशावर ताण टाकेल, असे जाणकार सांगतात. 1 एप्रिलपासून नवे दर लागू केले जाणार आहेत.
होलसेल प्राईज इंडेक्सने दिलेल्या आकडेवारीचा अभ्यास आणि विचार करुनही ही वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलेला असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. एनजीजीए म्हणजेच नॅशनल फार्मासिट्युकल प्रायझिंग ऑथोरिटीने याबाबतची माहिती दिली आहे.
नॅशनल फार्मासिट्युकल प्रायझिंग ऑथोरिटीनं शुक्रवारी एक पत्रक जारी करत याबाबतचा आपला निर्णय जाहीर केला आहे. या निर्णयानुसार आता तापावरील औषधांच्या किंमती महागण्याची दाट शक्यता आहे. फक्त तापच नव्हे, तर तापासारख्या इतरही अनेक छोट्या मोठ्या आजारांवरील औषधं महागणार आहेत.