विश्रांतवाडी, दि.12(प्रतिनिधी) – देशाचे संविधान समता, स्वातंत्र्य आणि बंधुभाव शिकवते. परस्परांमधील वैरभाव संपवून प्रेमाची भावना जागृत करते. भारतीय संविधानामुळेच देश एकसंघ आहे. संविधानाचे जतन करणे हेच खरे देशाभिमान असल्याचे प्रतिपादन पुणे महापालिकेचे माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी केले.
प्रभाग क्र. 2 मधील नागपुरचाळ-महाराष्ट्र हौसिंग बोर्ड या ठिकाणी पालिकेच्या वतीने व डॉ. धेंडे यांच्या सहकार्याने “हर घर तिरंगा, हर घर संविधान’ या अभियानाला सुरुवात करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. प्रभागातील ओम् चैतन्य हास्य क्लब, प्रेरणा ज्येष्ठ नागरिक संघ, दत्त रिक्षा स्टॅंड, पथारी व्यावसायिक संघटना, नागपुरचाळ-महाराष्ट्र हौसिंग बोर्ड व्यापारी असोसिएशन, तक्षशिला महिला मंडळ या ठिकाणी नागरिकांना राष्ट्रध्वज व संविधानाची प्रस्तावना प्रत देण्यात आली.
या वेळी राजू बाफना, नामदेव घाडगे, यशवंत शिर्के, महेश शिर्के, प्रकाश आम्रे, कैलास रणपिसे, सुरेश सकपाळ, अण्णा मोहिते, शिवाजी पड्याळ, कविता गाडगे, दिपाली शिर्के, विजय कांबळे, गजानन जागडे, विशाल जगताप, दत्ता कदम, गणेश पारखे, भिमराव जाधव, विनायक महाडिक, संजय वाईकर, दिनेश थोरात, नाना बनसोडे, स्वप्निल कुताळ, सतीश कांबळे आदी उपस्थित होते.