बॉलीवूड अभिनेत्री प्रिती झिंटा सोशल मीडियावर खूप ऍक्टिव्ह असते. प्रिती झिंटाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती घरातच शेती करताना दिसत आहे. यात प्रिती काही देशी शिमला मिर्ची तोडताना दिसतेय.
प्रिती तिच्या सेंद्रीय शेतीच्या ताज्या मिर्चीबद्दल खूप उत्सुक आहे. तिची शैली पाहता हे सर्व करून तिला खूप आनंद झाला असल्याचे दिसते. ती सध्या तिचा नवरा जीन गुडनिफ याच्यासह अमेरिकेत आहे.
पहिला व्हिडीओ शेअर करताना प्रितीने लिहिले की, मी खूप उत्साही आणि थोडासा अभिमानही आहे. कारण मी कधीच विचार केला नव्हता की, मी बागकाम आणि निसर्गाच्या इतकी जवळ जाईन. हे मला खूप शांतता भाव देते. जननीमातेने माल जवळ आणल्याबद्दल धन्यवाद. यासह प्रितीने आपल्या आईसाठी एक पोस्ट शेअर केली आहे.
View this post on Instagram
My partner in crime❤️ #nationalpetday #bruno #dutchshepherd #dutchie #ting
कारण तिच्या आईने तिला घरी भाज्या पिकविण्याचे शिकवले होते. ती घरात शेती करीत असल्याचे तिने व्हिडीओमध्ये उघड केले आहे आणि ही कला तिच्या आईकडून शिकली आहे.
View this post on Instagram
दरम्यान, हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत असून त्याला चाहत्यांकडून लाखो लाईक्स मिळत आहेत.