वाई (प्रतिनिधी): वाई तालुक्यातील धोम- जांभळी भागात वादळी वाऱ्यामुळे वीजपुरवठा खंडीत झाल्याने पूर्ण परिसर रात्रभर अंधारात राहणार आहे.
सायंकाळी सातच्या सुमारास वादळी वाऱ्यामुळे धोम धरणाच्या जवळ २२ केव्ही उच्चदाब विद्युत वाहिनीवर झाड पडल्याने धोमपासून जांभळीपर्यंतच्या गावांचा वीजपुरवठा आज रात्री बंद राहणार आहे. उर्वरित भागातील लाईनची तपासणी करून वीजपुरवठा सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.