ठाण्यात मनसेने फोडल्या हंड्या; राज्य सरकारचा केला निषेध

मुंबई : कोरोनामुळे राज्य सरकारने दहीहंडी उत्सव साजरा करण्यास मनाई केलेली आहे. यामुळे भाजपा, मनसेने याला विरोध केला असून ठाणे, मुंबईत दहीहंडी उत्सव साजरा करणार असल्याचे मनसेने सांगितले होते. यामुळे पोलिस बंदोबस्तत असूनही सारे निर्बंध झुगारून मनसेने ठाणे, मुंबईत ठिकठिकाणी रात्र, पहाटेच्या सुमारास दहीहंडी उभारून, मानवी मनोरे उभारत दहीहंड्या फोडण्यात आल्या.

रात्री १२ वाजता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ठाण्यात दही हंडी फोडली. त्या कार्य़कर्त्यांना अटक झाली, परंतू रात्री २ च्या सुमारास तात्काळ जामिनावर सुटका ही झाली. हिंदू सणांसाठी आम्ही कितीही केसेस घेऊ असे मनसेने म्हटले आहे. कोरोनाचे नियम पायदळी तुडवत हंडी फोडण्यात आली. यावेळी अभिजीत पानसे व अविनाश जाधव यांची पोलिसांच्या बरोबर थोडी झटापट देखील झाली. भगवती शाळेच्या मैदानामध्ये ही दहीहंडी फोडण्यात आली. यावेळी 250 कार्यकर्ते होते.

आम्ही जे ठरवतो ते करतो, दहीहंडी उत्सव साजरा होणारच, असे मनसेचे नेत अविनाश जाधव यांनी सांगितले होते. तसेच बाहेरील राज्यांतून आम्हाला फोन येतात, महाराष्ट्रात दहिहंडी साजरी झालीच पाहिजे, राज ठाकरेंनी ती करावी, अशी मागणी होते असेही जाधव यांनी सांगितले. तर अभिजित पानसे यांनी आम्ही मराठी सण साजरा करणारच असे म्हटले होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.