काबुल : तालिबानी दहशतवाद्यांनी अफगाणिस्तान वर ताबा मिळवल्यानंतर जगातील बहुतेक सर्व देशांनी या घटनेचा निषेध केला असला तरी चीन मात्र तालिबान्यांच्या पाठीशी उभा आहे. कारण अफगाणिस्तानात सापडणाऱ्या तब्बल दोनशे लाख कोटी रुपयांच्या खनिजावर चीनची नजर आहे.
अफगाणिस्तान मधील घडामोडींचा भारतासह जगातील सर्व देशांनी निषेध केला असला तरी चीन पाकिस्तान आणि रशिया मात्र तालिबान्यांच्या बाजूने उभे आहेत. सर्व देशांनी अफगाणिस्तानमधील दूतावास बंद केले असले तरी या तीन देशांचे दूतावास मात्र व्यवस्थित सुरू आहेत. अर्थात चीनचे कारण संपूर्णपणे आर्थिक असून अफगाणिस्तानमध्ये सापडणाऱ्या खनिजावर त्यांची नजर आहे. अफगाणिस्तानमध्ये लिथियम सारखे अनेक दुर्मिळ खनिज पदार्थ आढळतात या खनिजावर चीनचा डोळा असून म्हणूनच तालिबान्यांच्या पाठीशी ते उभे आहेत.
लिथियम हे खनिज बॅटरीसाठी वापरले जाते आणि नजीकच्या भविष्यकाळात मध्ये जगात सर्वत्रच बॅटरीवर चालणारी वाहने रस्त्यावर धावणार असल्याने या खनिजाला मोठ्या प्रमाणावर महत्त्व प्राप्त झाले आहे. आगामी कालावधीमध्ये अफगाणिस्तानचा इतर देशांचे व्यापार बंद राहणार असल्याने चीनला अफगाणिस्तानची चांगले व्यापारी संबंध हवे आहेत.
अमेरिकेच्या डिफेन्स काँसिलने 2010 मध्येच अफगाणिस्तानला लिथियमचा सौदी अरेबिया असा गौरव केला होता. अमेरिकेला सुद्धा लिथियमचे महत्त्व माहित आहे. सन 2000 मध्ये हे खनिज प्रथम सापडले तेव्हा त्याची किंमत दोनशे लाख कोटी होती आता हे मूल्य प्रचंड वाढले असल्याचे संकेत मिळत आहेत.
अफगाणिस्तान मध्ये आणखीही काही दुर्मिळ खनिजे आहेत. त्याचा वापर युद्धविषयक सामग्री बनवण्यासाठी केला जाऊ शकतो. या खनिजावर ही चीनची नजर आहे याशिवाय अफगाणिस्तानमध्ये तांबे सोने नैसर्गिक वायू युरेनियम लोह या प्रकारची विविध प्रकारचे खनिजे सापडत असल्याने नजीकच्या काळात त्याला महत्त्व प्राप्त होणार आहे. ही खनिजे भूगर्भातून बाहेर काढण्याचे तंत्रज्ञान देण्याच्या मोबदल्यात चीन अफगाणिस्तान कडून मोठ्या प्रमाणावर फायदा मिळू शकतो असा तज्ञांचा अंदाज आहे.