मुंबई – करोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा दहीहंडी उत्सवास राज्य सरकाकडून बंदी घालण्यात आली आहे. मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून काळाचौकीमध्ये दहीहंडी फोडण्यात आली आहे. दरम्यान यावेळी मनसे कार्यकर्ते व पोलीस आमने-सामने आल्याचे बघायला मिळाले आहे.
राज्यात गेल्या काही दिवासांपासून अनलॉकची प्रक्रिया चालू करण्यात आली आहे. असे असले तरी सुद्धा अद्य़ाप धार्मिक स्थळे खुली करण्यात आली नाहीत तसेच धार्मिक कार्यक्रमांना सुद्भा बंदी घालण्यात आली, मात्र दुसकीकडे राजकीय कार्यक्रम मोठ्याप्रमाणात होताना दिसून येत आहेत. त्यामुळे मनसेने आक्रमक भूमिका घेत आज दहीहंडी उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, काळाचौकीमध्ये मनसेने दहीहंडी फोडली असून यावेळी मनसे कार्यकर्ते व पोलीस आमने-सामने आले असून पोलीसांना मनसे नेते बाळा नांदगावकर यांना ताब्यात घेतले आहे. नांदगावकर यांनी काळाचौकीमधील दहीहंडी फोडली असून त्यांना पोलिासांना ताब्यात घेतले आहे.