Raj Thackeray | Lok Sabha Election 2024 । Vasant More – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनविण्यासाठी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यात महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला आहे. त्यानंतर आज शनिवारी राज ठाकरे यांनी मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते महायुतीच्या उमेदवारांचा प्रचारही करणार असल्याचे जाहीर केले आहे.
आज मुंबईत राज ठाकरेंनी पक्षाचे प्रमुख नेते आणि पदाधिकारी यांची बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर प्रसार माध्यमांसमोर त्यांच्याकडून याबाबतची माहिती देण्यात आली. । Raj Thackeray | Lok Sabha Election 2024
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज एमआयजी क्लबमध्ये मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन महायुतीला प्रचारात सहकार्य करायचे की नाही, यासंदर्भातील बैठक घेतली. या बैठकीत महायुतीच्या उमेदवारांना प्रचारात सहकार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला.
यानंतर राज ठाकरेंनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट करत म्हटले की, 2014 च्या आधीच भूमिका ही निवडून आल्यावर तिकडे बदलू शकते तर मलाही भूमिका बदलणे आवश्यक होते. सगळे म्हणतात, राज ठाकरेंनी भूमिका बदलली पण याला भूमिका बदलणे म्हणत नाहीत, तर धोरणांवर टीका करणे म्हणतात. असं राज ठाकरे यावेळी म्हणाले.
दरम्यान, या पत्रकार परिषदेत त्यांना वसंत मोरेंबाबतही प्रश्न विचारण्यात आला होता. मात्र राज ठाकरेंनी त्यावर काहीही न बोलता हातवारे करून प्रतिक्रिया दिली. वसंत मोरेंच्या बाबतचा एक प्रश्न राज ठाकरे यांना विचारण्यात आला.
तेव्हा राज ठाकरेंनी कोणतीही प्रतिक्रिया न देता पत्रकाराच्या दिशेने केवळ हात जोडले आणि ते पत्रकार परिषदेतून उठून चालू लागले. यानंतर पदाधिकाऱ्यांना बाईट देऊन जा, असे ते म्हणाले तेव्हा मनसे पदाधिकाऱ्यांमध्ये एकच हशा पिकला.
वसंत मोरेंचा यू टर्न… राज ठाकरेंची घेणार भेट | Raj Thackeray । Vasant More
मनसेला सोडचिठ्ठी दिल्यानंतर वसंत मोरे आता राज ठाकरेंची भेट घेणार आहेत. होय… स्वतः वसंत मोरेंनी याबद्दल खुलासा केला आहे. वसंत मोरे यांनी अनेक वर्षांचे मनसेशी असलेले नाते तोडून वंचित आघाडीत प्रवेश केला. त्यानंतर त्यांना वंचित आघाडीची उमेदवारी मिळाली.
मनसेमधून बाहेर पडल्यामुळे साहेब नाराज आहेत, पण बघू काय करतात, असे वसंत मोरे यांनी सांगितले. ते म्हणाले, आमचे मतभेद झालेत पण मनभेद झालेले नाहीत. मी त्यांच्या सोबत २५ वर्ष होतो.
काय होते हे घोडा मैदान जवळ असेल तेव्हा बघू. लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांचा पाठिंबा मागण्याचा मी प्रयत्न करेन. परंतु काय करावे, हा सर्वस्वी त्यांचा निर्णय असणार आहे, असे वसंत मोरे यांनी सांगितले.