बेल्हे -राजुरी (ता. जुन्नर) येथील एक रुग्णाचा अहवाल करोना पॉझिटिव्ह आला असून, तालुक्यातील रुग्ण संख्या 33वर पोहचली आहे. यामुळे सध्या तालुक्यात ऍक्टिव्ह रुग्ण संख्या 10 झाली असल्याची माहिती जुन्नरचे तहसीलदार हनुमंत कोळेकर यांनी दिली.
या व्यक्तीला 7 जूनला विलगीकरण कक्षात दाखल केले होते. त्रास होऊ लागल्याने 9 जून रोजी स्वॅब तपासणीसाठी पुण्याला पाठवण्यात आला होता.
तेव्हा या रुग्णाचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. त्रास कमी होत नसल्याने दोन दिवसांपूर्वी पुन्हा स्वॅब टेस्ट करण्यात आले. त्याचा रिपोर्ट आज (दि. 14) पॉझिटिव्ह आला. ही व्यक्ती पुणे येथे उपचार घेत आहे.