पॅरिस – विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेतील पात्रता फेरीतील सामन्यात स्टार खेळाडू व कर्णधार ख्रिस्तियानो रोनाल्डोने तिन गोल करत आपले वर्चस्व सिद्ध केले. त्याच्या या कामगिरीच्या जोरावर पोर्तुगालने लक्झेम्बर्गचा 5-0 असा दणदणीत पराभव केला.
या सामन्यात रोनाल्डोने 8 व्या आणि 13 व्या मिनिटाला गोल करत मिळालेल्या पेनल्टीचा पुरेपुर लाभ घेतला. त्यानंतर 17 व्या मिनिटाला त्याचा मॅंचेस्टर युनायटेड संघातील सहकारी ब्रुनो फर्नाडेझने गोल केल्यानंतर पहिला हाफ संपला त्यावेळी पोर्तुगालकडे 3-0 अशी आघाडी होती.
दुसरा हाफ सुरु झाल्यावर जाओ पालहिन्हाने चौथा गोल केला व आघाडी 4-0 अशी वाढवली. त्यानंतर रोनाल्डोने आपला तिसरा व संघाचा पाचवा गोल केला.