Cristiano Ronaldo – Salman Khan : अभिनेता सलमान खान हे अभिनयाच्या जगात मोठे नाव आहे तर क्रिस्टियानो रोनाल्डोची गणना जगातील सर्वोत्तम फुटबॉलपटूंमध्ये केली जाते. जेव्हा या दोन महान व्यक्तिमत्त्वांना एकाच स्टेजखाली एकत्र पाहिले गेले तेव्हा त्यांचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होऊ लागले.
सध्या या दोघांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहून काही लोक म्हणाले की,’रोनाल्डोने सलमानकडे त्याच प्रकारे दुर्लक्ष केले आहे जसे सलमानने एका कार्यक्रमात विकी कौशलकडे दुर्लक्ष केले होते. पण सोशलवर होणारी ही चर्चा पूर्णपणे चुकीची आहे कारण असे काहीही झालेले नाही. सलमान आणि रोनाल्डोचा एक फोटो व्हायरल होत आहे, ज्यामध्ये दोघे एकमेकांशी हसताना आणि बोलताना दिसत आहेत.
दरम्यान, सलमान खान सौदी अरेबियाची राजधानी रियाधमध्ये होता, जिथे तो एका फुटबॉल इव्हेंटमध्ये गेला होता. फुटबॉल जगताचा बेभरवशाचा राजा ख्रिस्तियानो रोनाल्डोही येथे होता. दोघांना एकत्र पाहून चाहते आनंदी झाले. क्रिस्टियानो रोनाल्डोने सलमान खानकडे दुर्लक्ष केल्याचा हा व्हिडिओ आधी व्हायरल झाला होता. हे पाहून यूजर्सनी सलमानच्या फॅन्सची खिल्ली उडवायला सुरुवात केली. पण काही चाहत्यांनी सलमान आणि रोनाल्डोचे फोटो पोस्ट करत या अफवांना पूर्णविराम दिला, या फोटोमध्ये सलमान आणि रोनाल्डो एकत्र गप्पा मारतांना दिसत आहे. आता हा फोटोही इंटरनेटवर व्हायरल होत आहे.
दरम्यान त्यांच्या वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास, सलमान खानची अपकमिंग मूवी ‘टाइगर 3’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात कटरीना कैफ आणि इमरान हाशमी सोबत तो स्क्रिन शेअर करणार आहे.