पती धर्म निभावण्यासाठी पूनम यांना साथ – शत्रुघ्न सिन्हा

लखनौ – कॉंग्रेसचे उमेदवार असूनही समाजवादी पक्षाने (सप) उमेदवारी दिलेल्या पत्नीच्या रोड शोमध्ये सहभागी झाल्याचे ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी समर्थन केले आहे. पती धर्म निभावण्यासाठी पत्नी पूनम यांना साथ दिल्याचे त्यांनी म्हटले आहे.

भाजपला रामराम ठोकून शत्रुघ्न काही दिवसांपूर्वी कॉंग्रेसमध्ये दाखल झाले. त्यानंतर कॉंग्रेसने बिहारच्या पाटणासाहिब मतदारसंघातून त्यांना रिंगणात उतरवले. तर सपने पूनम यांना उत्तरप्रदेशच्या लखनौमधून अनपेक्षितपणे उमेदवारी दिली. उत्तरप्रदेशात सप आणि कॉंग्रेस एकमेकांच्या विरोधात लढत आहेत. मात्र, पूनम यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला त्यावेळी त्यांच्यासमवेत शत्रुघ्न उपस्थित राहिले. त्यानंतर पूनम यांच्या रोड शोमध्येही ते सहभागी झाले. त्यावरून लखनौमधील कॉंग्रेसचे उमेदवार प्रमोद कृष्णन यांनी शत्रुघ्न यांच्यावर टीकास्त्र सोडले. शत्रुघ्न यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला असला तरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून ते बाहेर पडले नसल्याचेच दिसते, अशा शब्दांत कृष्णन यांनी नाराजी व्यक्त केली. त्यावर प्रतिक्रिया देताना शत्रुघ्न यांनी पूनम यांना साथ दिल्याचे समर्थन केले. मी आणि भाजपमधून बाहेर पडलेले ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा कधीच संघात नव्हतो, असेही त्यांनी नमूद केले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.