मुंबई – पूजा हेगडे लवकरच प्रभासबरोबर “राधे शाम’मध्ये दिसणार आहे. त्याशिवाय दक्षिणेतील स्टार थलपती विजय बरोबर ती एका सिनेमात असणार आहे. अर्थात या दोघांच्या एकत्रित सिनेमाची अद्याप अधिकृतपणे घोषणा केली गेलेली नाही. चित्रपटातील तिच्या भूमिकेबाबत ती नेहमीच चर्चेत असते.
पूजा तिच्या चित्रपटातील भूमिकांबाबत सांगते कि, अनेकदा नायिकेच्या भूमिकेला दुय्यम समजलं जातं किंवा संकलनातही भूमिकांना कात्री लागते. पूजाला मात्र त्याबद्दल विशेष काळजी घ्यायला आवडतं. ती पुढे म्हणते, ‘कुठल्याही चित्रपटात माझी भूमिका कापली जाणार नाही किंवा तिचं मातेरं होणार नाही, याची मी खात्री करून घेते. कुणी भूमिका कापलीच, तर पाहून घेईन.’
वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर पूजा हेगडे ‘राधे श्याम’ या चित्रपटात प्रभाससोबत दिसणार आहे. हा चित्रपट रिलीजसाठी पूर्णपणे तयार आहे आणि 14 जानेवारी 2022 रोजी तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता, परंतु कोरोनाच्या वाढत्या केसेसमुळे त्याची रिलीज डेट पुढे ढकलली आहे. आता ११ फेब्रुवारीला हा चित्रपट रिलीज होणार आहे.