मुंबई – दाक्षिणात्य सुपरस्टार धनुषनं काही दिवसांपूर्वी त्याची पत्नी म्हणजेच अभिनेते राजनीकांत यांची थोरली मुलगी ‘ऐश्वर्या’बरोबर घटस्फोट घेतला आहे. या दोघांनी एक मताने हा निर्णय घेतला असून, या संदर्भातील एक पोस्ट सुद्धा या जोडीनं सोशल मीडियावर शेअर केली होती. दरम्यान, या सर्व प्रकरणानंतर धनुष आपल्या आगामी कामात बिझी झाला आहे.
धनुष आणि ऐश्वर्या 18 नोव्हेंबर 2004 मध्ये विवाह बंधनात आडकले होते. त्यांच्या लग्नाची खूप चर्चा रंगली होती. धनुष आणि ऐश्वर्या दोन मुलांचे आई-वडील असून त्यांच्या मुलांची नावे याथरा आणि लिंगा अशी आहेत. धनुष सोशल मीडियावर फारसा सक्रिय नसतो. पण तो आपल्या कामातून वेळ काढून स्वतःच्या इंस्टाग्रामवर काही फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतो.
View this post on Instagram
नुकतंच धनुषने आपल्या इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. पत्नी ऐश्वर्यापासून वेगळं झाल्यानंतर धनुषची ही पहिलीच पोस्ट आहे. या फोटोमध्ये तो त्याचा मुलगा याथरा सोबत क्वालिटी टाइम स्पेंड करताना दिसत आहे. या फोटोमध्ये वडील आणि मुलातलं खास बॉन्डिंग दिसून येत आहे. त्यांचा हा फोटो “नान वरूवेन’ चित्रपटाच्या लोकेशनवरील आहे. दरम्यान, फोटो शेअर करताना धनुषने “याला मी याआधी कुठे पाहिलं आहे का?’ असं सुंदर कॅप्शन दिल आहे. वडील-मुलाच्या या फोटोवर नेटकऱ्यांनी लाईक आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.