मुंबई- अर्जुन कपूर, नसिरुद्दीन शाह, तब्बू, कोंकणा सेन शर्मा आणि राधिका मदान यांसारख्या दिग्गज कलाकारांचा सहभाग असलेल्या ‘कुत्ते’ चित्रपटाचं मोशन पोस्टर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित करण्यात आलं होत. प्रदर्शित होताच पोस्टरने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं.
या आगळ्या वेगळ्या पोस्टरवर माणसांच्या चेहऱ्यांच्या जागी कुत्र्यांचे चेहरे लावण्यात आल्याने प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबद्दल उत्सुकता निर्माण झाली. या चित्रपटाचं दिग्दर्शन विशाल भारद्वाज आणि रेखा भारद्वाज यांचा मुलगा आसमान भारद्वाज करत आहे. आसमानचा दिग्दर्शक म्हणून हा पहिलाच चित्रपट आहे.
दरम्यान, नुकतंच अर्जुन कपूरने आपल्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली असून, दिग्दर्शक आसमान भारद्वाजचं कौतुक करत आभार मानले आहेत. अर्जुन म्हणाला की.., ‘हा माझा १७ वा चित्रपट आहे. त्यामुळे हा चित्रपट नेहमीच माझ्यासाठी खास असणार असणार आहे.’ चित्रपटातील भूमिकेसाठी अर्जुननं मिशा देखील वाढवल्या होत्या. या आशयाची पोस्ट अर्जुन कपूर याने केली आहे. ‘कुत्ते’ चित्रपटाच्या पहिल्या झलकवरून तरी हा सिनेमा एक कॉमेडी असणार आहे, असा अंदाज सिनेरसिकांनी लावला आहे.