Entertainment । ‘हिरमंडी’ रिलीज झाल्यापासून या मालिकेची आणि दिग्दर्शक संजय लीला भन्साळीची चर्चा होत आहे. भन्साळी हे त्यांच्या परफेक्शन आणि डिटेलिंगसाठी ओळखले जातात. दिग्दर्शकाच्या मालिकेत रिचा चढ्ढा हिने एक छोटीशी पण दमदार भूमिका साकारली आहे.
या मालिकेत रिचा लज्जोची भूमिका साकारत आहे, जी एका नवाबाच्या प्रेमात पडते. अभिनेत्रीने कपिल शर्माच्या शोमध्ये सांगितले होते की तिने तिच्या एका डान्स नंबरसाठी 99 टेक घेतले होते. आता दिग्दर्शक भन्साळी यांनी यावर भाष्य केले आहे.
रिचा चढ्ढा हिने ‘हिरामंडी’ मधील ‘मासूम दिल है मेरा’ गाण्यात जबरदस्त परफॉर्मन्स दिला आहे. मात्र हे गाणे शूट करताना अभिनेत्रीला नीट परफॉर्म करता आले नाही. भन्साळी यांनी सांगितले की, त्याने रिचाला फटकारले होते, त्यानंतर ती स्वतः चिडली होती. शूट संपेपर्यंत अभिनेत्रीला अश्रू अनावर झाले होते. तर गाण्याच्या व्हिडिओमध्ये रिचा चढ्ढा रडताना दिसत आहे, तेच तिचे खरे अश्रू आहेत.
इंडिया टुडेशी बोलताना भन्साळी म्हणाले की, ‘रिचाला उत्तम कामगिरी करण्यासाठी वेळ लागत होता. तो एक खास क्षण होता. मला पाहिजे तो शोट मिळत नव्हता. थोड्या वेळाने मी थोडा अस्वस्थ झालो. मी रीचाला म्हणालो- तू प्रॅक्टिस केली आहेस, तरीही तुला जमत नाही. मला थोडा राग आला आणि ती पण नाराज झाली. आमच्या यावेळी वाद झाला. मात्र नंतर मला त्या गाण्याचा शॉट मिळाला. यानंतर मी झालेल्या वादाबाबत रिचाची माफी मागितली. असेही भन्साळी म्हणाले.
हे वाचाल का ?
बोल्ड अभिनेत्रीच्या टॅगबाबत नीना गुप्ताने केला धक्कादायक खुलासा