Lok Sabha Election 2024 । संदेशखळी,पश्चिम बंगाल येथील रहिवासी असलेल्या तीनपैकी एका महिलेने बुधवारी 8 मेला तृणमूल काँग्रेस (टीएमसी) नेत्यांवरील बलात्काराचे आरोप मागे घेतले. बंगालमधील उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील संदेशखळी येथील रहिवासी असलेल्या महिलेने आरोप मागे घेतले आणि सांगितले की, ‘तिच्यावर कोणताही लैंगिक गुन्हा केलेला नाही. भाजपच्या सदस्यांनी कोऱ्या कागदावर सही करून पोलिसांशी संपर्क साधल्याचा आरोपही या महिलेने केला आहे.’
मिळलेल्या वृत्तानुसार, महिलेने सांगितले की, ‘भाजपने माझ्यावर कोऱ्या कागदावर सही करण्यासाठी आणि बलात्काराची तक्रार नोंदवण्यासाठी दबाव आणला होता.” खोटे आरोप मागे घेतल्याबद्दल या महिलेला आता धमक्या आणि सामाजिक बहिष्काराचा सामना करावा लागत आहे. या संदर्भात महिलेने संदेशखळी पोलिस ठाण्यात नवीन तक्रारही दाखल केली आहे. संदेशखळी येथे महिलांवरील बलात्काराचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली होती.’
Lok Sabha Election 2024 । गृहनिर्माण योजनेच्या नावावर बनावट स्वाक्षरी
महिलेने आरोप केला आहे की,’स्थानिक भाजप महिला मोर्चाचे अधिकारी आणि पक्षाचे इतर सदस्य तिच्या घरी आले. यानंतर तिला बनावट तक्रारीवर सही करण्यास सांगण्यात आले.
महिलेने सांगितले की,हाऊसिंग स्कीममध्ये माझे नाव समाविष्ट करण्याच्या लाच देत त्यांनी माझी स्वाक्षरी मागितली. नंतर ते मला पोलिस ठाण्यात घेऊन गेले, जिथे मला बलात्काराची तक्रार नोंदवण्यास सांगण्यात आली. टीएमसी कार्यालयात माझा लैंगिक छळ झाला नाही. मला कधीही रात्री उशिरा पार्टी कार्यालयात जाण्याची सक्ती केली गेली नाही.’
Lok Sabha Election 2024 । भाजपचे लोक करत आहेत ‘सामाजिक बहिष्कार’
महिलेने सांगितले की,’जेव्हापासून तिने आपली भूमिका मांडली आणि बलात्काराचे आरोप मागे घेतले तेव्हापासून तिच्या कुटुंबाला स्थानिक भाजप अधिकाऱ्यांकडून सामाजिक बहिष्काराचा सामना करावा लागत आहे.आम्हाला असुरक्षित वाटत आहे आणि मी आता पोलिसांची मदत मागितली आहे.’
Lok Sabha Election 2024 । संदेशखळी बलात्कार प्रकरण बनावट असल्याचा दावा स्टिंग ऑपरेशनमध्ये करण्यात आला आहे…
त्याचवेळी एका स्टिंग ऑपरेशनचा व्हिडीओ समोर आल्यानंतर भाजप नेत्यांवर महिलेच्या वतीने हे आरोप करण्यात आले आहेत. संदेशखळीतील कटामागे पश्चिम बंगाल विधानसभेचे विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांचा हात असल्याचा दावा या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती करत आहे. एएनआयच्या वृत्तानुसार, गंगाधर कोयल नावाचे भाजप मंडल (बूथ) अध्यक्ष व्हिडिओमध्ये म्हणतात की संदेशखळीच्या महिलांचा लैंगिक छळ झाला नाही. विरोधी पक्षनेत्याच्या आदेशानुसार तिला ‘बलात्कार’ पीडित म्हणून पुढे करण्यात आले.
हे वाचले का ? नवनीत राणांच्या ’15 सेकंद’ वक्तव्यावर ओवेसी म्हणाले,’एक तास घ्या अन्…’