नगर -पोलीस खात्यात 33 वर्षे सेवा करणे सोपे काम नाही. आता पोलीस उपनिरीक्षकपदापर्यंत पोहोचलेल्या सर्वच अधिकाऱ्यांनी पोलीस खात्याची मान उंचावले, असेच काम भविष्यात देखील करावे, अशा शुभेच्छा अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. दत्ताराम राठोड यांनी दिल्या.
पोलीस खात्यातील 33 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर सहायक फौजदार मधुकर शिंदे, अनिल गाडेकर, नवनाथ दहातोंडे, शैलेंद्र जावळे, अशोक लाड, अनिल भारती व दीपक पाठक यांना पोलीस उपनिरीक्षकपदी बढती मिळाली. त्यांचा सत्कार करताना ते बोलत होते. या सर्वांचा अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. दत्ताराम राठोड यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.