किशनगंज – बिहारमधील किशनगंजमधून एक हृदयद्रावक बातमी समोर येत आहे. बंगालच्या सीमेवर छापा टाकण्यासाठी गेलेल्या किशनगंज टाऊन पोलिस स्टेशनच्या उपप्रमुखाची निर्घृणपणे हत्त्या करण्यात आली आहे. स्टेशनचे उपप्रमुख अश्वनी कुमार आपल्या पथकासह शुक्रवारी रात्री चोरीच्या प्रकरणात किशनगंजला लागून असलेल्या बंगालमधील बनापारावर छापा मारण्यासाठी गेले होते.
अश्वनी कुमार यांची हत्या हा मॉब लिंचींगचा एक प्रकार असल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस प्रशासनात खळबळ उडाली आहे. माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकारी पूर्णिया आयजी सुरेश चौधरी आणि एसपी कुमार आशुतोष घटनास्थळी दाखल झाले आहेत.
किशनगंज पोलिस स्टेशन प्रभारीचा मृतदेह इस्लामपूर रुग्णालयात पोस्टमार्टमसाठी आणण्यात आला. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत येथे शवविच्छेदन करण्यात आले. अशा प्रकारे पोलिस कर्मचाऱ्याची निर्घृणपणे हत्या केल्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वीही छाप्यात अनेक पोलिस कर्मचाऱ्यांचा बळी गेल्याच्या घटना घडल्या आहेत.
24 फेब्रुवारी रोजी दारूची तस्करी आणि दारूच्या सामानाची गुप्त माहिती मिळाल्यामुळे मेजरगंज येथील रहिवासी दिनेश राम यांनी त्यांच्या पथकासह बिहारच्या सीतामढी येथे छापा टाकला. यावेळी तस्करांनी त्यांना गोळ्या घालून ठार केले. या हत्येप्रकरणी तीन निर्ढावलेल्या आणि इतर अज्ञात गुन्हेगारांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.