Bihar Patna Junction Pal Hotel Fire Accident: बिहारची राजधानी पाटणा येथे रेल्वे जंक्शनसमोर असलेल्या पॉल हॉटेलला भीषण आग लागली. या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला. हॉटेलमध्ये अडकलेल्या सुमारे 45 जणांची सुटका करण्यात आली आहे. आगीत भाजलेल्या व जखमी झालेल्या सुमारे 15 जणांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. हॉटेलमध्ये सुमारे दोन तास आग धुमसत होती. ही घटना गुरुवारी सकाळी अकराच्या सुमारास घडली.
आगीमुळे परिसरात एकच गोंधळ उडाला. आग इतकी भीषण होती की ती विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांनी केलेली व्यवस्था अपुरी ठरली. हॉटेलजवळील इतर इमारतींमध्ये आग पसरत होती.
#WATCH | Bihar: Massive fire breaks out in a hotel near Golambar in Kotwali police station area, in Patna. Fire tenders present at the spot. Firefighting and rescue operations underway. 12 people rescued so far and sent to PMCH. pic.twitter.com/yp9AI3w3aV
— ANI (@ANI) April 25, 2024
45 जणांची सुटका –
अग्निशमन विभागाचे डीआयजी मृत्युंजय कुमार घटनास्थळी उपस्थित होते. आग जवळपास आटोक्यात आल्याचे त्यांनी सांगितले आहे. कोणीही आत अडकू नये यासाठी हॉटेलच्या आतील खोल्यांची झडती घेतली जात आहे. हॉटेलमधून सुमारे 45 जणांची सुटका करण्यात आली आहे. अकराच्या सुमारास हॉटेलला आग लागल्याची माहिती त्यांना मिळाली. अग्निशमन दलाच्या जवानांनी मोठ्या हिंमतीने काम केले.
पॉल हॉटेलला आग लागल्याच्या वृत्ताने घबराट निर्माण झाली. घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. हॉटेलमध्ये अडकलेल्या लोकांना वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू होते. हॉटेलच्या इमारतीला लागलेली आग विझवण्याचे आणि आसपासच्या इतर इमारतींना त्यातून वाचवण्याचे प्रयत्न सुरू झाले. वाऱ्यासह वाढणाऱ्या आगीच्या ज्वाळांमुळे लोक घाबरत होते. घटनास्थळी उपस्थित असलेले पोलीस आणि अग्निशमन अधिकारी आगीच्या कारणाचा तपास करत आहेत. प्राथमिक माहितीनुसार सिलिंडरचा स्फोट झाल्याने आग लागल्याचे सांगितले जात आहे.