मुंबई – पीएमसी बँक घोटाळ्या प्रकरणी शिवसेनेने केलेल्या आरोपानंतर अडचणीत आलेल्या नील सोमय्यांना न्यायालयाकडून दिलासा मिळाला नाही. भाजपनेते किरीट सोमय्या यांचे पुत्र नील सोमय्या यांना न्यायालयाने अटकपूर्व जामीन नकारला आहे.
आज मुंबई सत्र न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला. अतिरिक्त सत्र न्यायाधीश दीपक भागवत यांनी हा निर्णय दिला. सोमवारी नील सोमय्या यांच्या अटकपूर्व जामिनावरील सुनावणी पू्र्ण झाली होती. ज्येष्ठ वकील अशोक मुंदरगी यांनी सोमय्यांसाठी युक्तीवाद केला होता.
शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी नील सोमय्या यांच्यावर आरोप केले होते. त्यानंतर नील सोमय्या आणि पीएमसी बँक घोटाळ्यातील प्रमुख आरोपी राकेश वाधवान यांचे संबंध आहेत असा त्यांचा आरोप होता. त्यानंतर नील सोमय्या यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता.
दरम्यान अटक टाळण्यासाठी नील सोमय्या यांनी कोर्टात धाव घेतली होती. मात्र त्यांना न्यायालयाकडून दिलासा मिळाला नाही.