नवी दिल्ली – राजधानी दिल्लीमध्ये ढगाळ हवामानामुळे आपण सूर्यग्रहण बघू शकलो नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. मात्र कोझिकोडमधून या ग्रहणाची छटा आपल्याला बघायला मिळाली. “लाईव्ह स्ट्रीम’द्वारेही या ग्रहणाचे निरीक्षण करता आल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे. तज्ञांशी संवाद साधल्यावर ग्रहणाशी संबंधी आपल्या ज्ञानात भरच पडल्याचेही पंतप्रधानांनी म्हटले आहे.
गुरुवारी सकाळी धुक्यामुळे दिल्लीत सूर्यग्रहण दिसू शकले नाही, तरी देशाच्या दक्षिणेकडील भागातील लोकांनी हा दुर्मिळ खगोल शास्त्रीय आविष्कार अनुभवला.
सूर्यग्रहण बघण्याचा प्रयत्न करत असतानाचे काही फोटोही पंतप्रधानांनी पोस्ट केले आहेत. एका ट्विटर युजरने मोदींना सूर्याकडे पाहत असलेला हा फोटो पोस्ट केला आणि ते “मीम’ होत असल्याचे म्हटले. तेव्हा मोदींनी आपल्या त्याला उत्तर देताना “मोस्ट वेलकम …. एन्जॉय :)’ असे उत्तर दिले.