स्वाती मालीवाल प्रकरण : दिल्ली पोलिसांनी विभव कुमारला घेतले ताब्यात

Bibhav Kumar in Custody । आम आदमी पक्षाच्या (आप) खासदार स्वाती मालीवाल यांच्यासोबत झालेल्या कथित मारहाण प्रकरणी दिल्ली पोलिसांनी विभव कुमारला अटक केली आहे. दिल्ली पोलिसांच्या एफआयआरमध्ये विभव कुमारचे नाव आहे. आता याप्रकरणी त्याची अधिक चौकशी केली जाणार आहे.
दिल्ली पोलिसांनी विभव कुमारला मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या निवासस्थानातून अटक केली आहे. त्यांना सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्यात नेण्यात आले आहे. विभव कुमार, त्यांना माध्यमातून एफआयआरची माहिती मिळाली. त्याचबरोबर विभव कुमारनेही ईमेलद्वारे पोलिसांकडे तक्रार केली आहे. दिल्ली पोलिसांनी त्याच्या तक्रारीची दखल घ्यावी, असे आवाहन विभवने केले आहे. आपल्याला कोणतीही नोटीस मिळाली नसल्याचेही विभव कुमार यांनी म्हटले.
मालीवाल यांच्या वैद्यकीय तपासात दुखापतीची पुष्टी Bibhav Kumar in Custody ।
दरम्यान, स्वाती मालीवाल यांनी विभव कुमार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. स्वाती मालीवाल यांनी सांगितले की, “जेव्हा ती सीएम केजरीवाल यांच्या निवासस्थानी पोहोचली तेव्हा विभव कुमारने तिच्याशी गैरवर्तन अन् मारहाण केली. दुसरीकडे, स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीवरून दिल्ली पोलिसांनी एफआयआर नोंदवला.
एफआयआरनंतर स्वाती मालीवाल यांची एम्समध्ये वैद्यकीय तपासणी करण्यात आली. ज्यांच्या अहवालात स्वातीच्या डाव्या पायावर आणि उजव्या डोळ्याखाली जखमेच्या खुणा असल्याचे सांगण्यात आले आहे. स्वातीने डोकेदुखी आणि मान ताठ असण्याचीही तक्रार केली आहे.
राघव चढ्ढा दिल्लीला परतले Bibhav Kumar in Custody ।
दुसरीकडे भाजपने शनिवारी पत्रकार परिषदेत स्वाती मालीवाल यांचा मुद्दा उपस्थित करत आम आदमी पार्टी विभव कुमार यांना संरक्षण देत असल्याचा आरोप केला. दिल्लीत राजकीय घडामोडी बदलत असताना राघव चढ्ढा लंडनहून परतले असून त्यांनी शनिवारी मुख्यमंत्री केजरीवाल यांचे निवासस्थानही गाठले.
हेही वाचा
खासदार राघव चढ्ढा मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या भेटीसाठी दाखल ; लंडनमध्ये सुरू होते उपचार





