खासदार राघव चढ्ढा मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या भेटीसाठी दाखल ; लंडनमध्ये सुरू होते उपचार

Raghav Chaddha meet Kejriwal । दिल्लीत राजकीय पेच वाढला आहे. आता लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यापूर्वी आज पक्षाचे खासदार राघव चड्डा मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या घरी पोहोचले आहेत. लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यापासून राघव चढ्ढा उपचारासाठी परदेशात गेले होते. त्यानंतर आता परतले आहेत.
राघव चढ्ढा डोळ्यांच्या गंभीर आजाराने होते त्रस्त Raghav Chaddha meet Kejriwal ।
राघव चढ्ढा यांच्या डोळ्यांवर ब्रिटनमध्ये उपचार सुरू असल्याची माहिती दिल्ली सरकारचे मंत्री सौरभ भारद्वाज यांनी फार पूर्वीच दिली होती. राघवची प्रकृती गंभीर असून वेळेवर उपचार न मिळाल्यास त्याची दृष्टी गेली असती, असे त्यांनी सांगितले होते. अशा परिस्थितीत त्यांना सावरायला वेळ लागू शकतो. तसेच राघव चड्ढा लवकरच बरे होतील अन् लोकसभा निवडणुकीदरम्यान निवडणूक कामात सहभागी होतील,”असेही सौरभ भारद्वाज यांनी सांगितले होते.
राघव चढ्ढा दिल्ली निवडणुकीपूर्वी भारतात परतले Raghav Chaddha meet Kejriwal ।
दिल्लीत सहाव्या टप्प्यात म्हणजेच २५ मे रोजी लोकसभा निवडणुका होणार आहेत. लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यापासून राघव चढ्ढा परदेशात होते. मात्र आता ते मतदानापूर्वीच परतले आहेत. राघव चढ्ढा आता २५ मे रोजी मतदानापूर्वी प्रचाराला सुरुवात करू शकतात, असे मानले जात आहे.
हेही वाचा
“भाजपने देवेंद्र फडणवीस यांचे राजकारण संपवले, आता पुढचा नंबर…” ; अरविंद केजरीवाल यांचा गंभीर आरोप





