बारामती, (प्रतिनिधी)- सातत्य व आत्मविश्वास या जोरावर आपण खेळामध्ये यश मिळवू शकता व आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू शकता, असे प्रतिपादन अर्जुन पुरस्कार (कबड्डी) विजेते अर्जुन पुरस्कार विजेते अशोक शिंदे यांनी केले. बारामती स्पोर्ट्स ॲकॅडमीच्या वतीने उन्हाळी प्रशिक्षण शिबिराचा शुभारंभ व खेळाडूंचा सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी आंतरराष्ट्रीय खेळाडू व प्रो कबड्डी सीजन १० विजेते पुणेरी पलटण संघाचा कर्णधार असलम इनामदार प्रमुख अतिथी व बारामती तालुका क्रीडा अधिकारी महेश चावले, पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सदस्य सतपाल गावडे, शंभू भोपळे, वसीम इनामदार, राष्ट्रीय खेळाडू मंगेश मुरकुटे, बारामती स्पोर्ट्सचे सदस्य दत्ता चव्हाण, खजिनदार बारामती स्पोर्ट्स ॲकॅडमी मोहन कचरे, स्ट्रेंन्थ अँड कंडिशनिंग प्रशिक्षक शिवाय पायघान,
प्रो कबड्डी खेळाडू बंगाल वॉरियर्स दीपक शिंदे, प्रो कबड्डी खेळाडू बंगाल वॉरियर्स श्रेयश उमरदंड, बारामती स्पोर्ट्ससाठी खेळाडू ऋषिकेश बनकर, ओंकार गाडे, ओंकार लाळगे, ओंकार शिंदे, साक्षी काळे, ऐश्वर्या झाडबुके, प्रशिक्षक, खेळाडू व पालक उपस्थित होते. अस्लम इनामदार यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले. यावेळी राज्य व राष्ट्रीय पातळीवरील यशस्वी खेळाडूंचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. अजिनाथ खाडे यांनी आभार मानले.
प्रतिभावंत खेळाडू देशपातळीवर पोहोचले
बारामती स्पोर्ट्स अकॅडमीचे संस्थापक अध्यक्ष प्रो कबड्डी खेळाडू व एनआयएसचे कोच दादासाहेब आवाड म्हणाले की, ग्रामीण भागातील खेळाडूंना हक्काचे मैदान प्राप्त होणे व योग्य मार्गदर्शन मिळावे, कबड्डी खेळाचा प्रसार व प्रचार व्हावा. त्यामधून गुणवंत खेळाडू निर्माण होण्यासाठी बारामती स्पोर्ट्स अकॅडमीची स्थापना केली आहे.
२०१७ पासून गुणवंत व प्रतिभावंत खेळाडू हे राज्य व राष्ट्रीय पातळीवरील तयार झाले आहेत, हे खास वैशिष्ट्य आहे. दरवर्षी हा उपक्रम जिल्हा क्रीडा संकुल येथे होत असतो. नवीन विध्यार्थी व खेळाडूंनी त्यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले.