ग्रामपंचायतीच्या नोटिशीला दुकानदारांनी दाखविली केराची टोपली
शिक्रापूर – शिक्रापुरात प्लॅस्टिकबंदीचा बोजवारा उडला आहे. प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा वापर करून नये याकरिता ग्रामपंचायतीने दुकानदारांना नोटीस दिली होती. पण दुकानदारांनी त्या नोटिशीला केराची टोपली दाखवली आहे. तसेच कचरा डेपोमधील जमा होणाऱ्या कचऱ्यात मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिकचा कचरा दिसून येत आहे.
प्लॅस्टिकचे दुष्परिणाम लक्षात घेऊन राज्य शासनाकडून प्लॅस्टिकबंदीचा आदेश काढण्यात आला होता. या आदेशाची अंमलबाजवणी ग्रामपंचायत पातळीवर करण्यात आली.
शिक्रापूर ग्रामपंचायतच्या वतीने प्लॅस्टिकबंदीसाठी यापूर्वी सर्व व्यावसायिकांना नोटीस बजावल्या आहेत. प्लॅस्टिकबंदीबाबत गावातून प्रभातफेरी देखील काढली आहे. तसेच जे व्यावसायिक प्लॅस्टिक वापरत नाही, त्यांचा सन्मान सुद्धा केलेला आहे. पण प्लॅस्टिकचा वापर पुन्हा वाढला असेल, तर पुन्हा जनजागृती केले जाईल.
– गुलाब नवले, ग्रामविकास अधिकारी