भीषण अपघातात दुचाकीस्वार ठार
शिरवळ – शिरवळ (ता. खंडाळा) गावच्या हद्दीमध्ये डिझेल चेक करण्याकरिता थांबलेल्या टेम्पोला पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या दुचाकीने जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात होऊन अक्षय तानाजी तोडकर (वय 25, रा. कुरवली खुर्द, ता. फलटण) हा दुचाकीस्वार ठार झाला आहे.
अधिक माहिती अशी, वाई येथून थर्मापफ एमएफजी. एलएलपी या कंपनीमधून फ्रिज पॅकिंगचा माल भरून खंडाळा तालुक्यातील विंग येथील कंपनीमध्ये खाली करण्यासाठी निघालेला टेम्पो शिरवळ गावच्या हद्दीत आला असता डिझेल चेक करण्यासाठी महार्गालगत थांबला होता.
टेम्पोचालक सचिन काळे हा डिझेल चेक करत होता. यावेळी दुचाकीवरुन पुण्याच्या बाजुने साताऱ्याच्या दिशेने भरधाव वेगात निघालेला अक्षर तोडकर याला रस्त्याकडेला थांबलेल्या टेम्पोचा अंदाज न आल्याने तो टेम्पोवर जाऊन आदळला. या भीषण अपघातात अक्षय गंभीर जखमी झाल्याने त्याला शिरवळ येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. अपघात प्रकरणी टेम्पोचालक सचिन काळे यांनी शिरवळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सागर अरगडे, सहाय्य्यक पोलीस उपनिरीक्षक रमेश वळवी, पोलीस हवालदार अमोल जगदाळे, विनोद पवार हे करीत आहे.